जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत व दिव्यांग बोर्डाच्या कामासाठी कंत्राटी क्लिनिकल सायकोलॉजीस्ट हे पद भरण्यात आले असल्याने रुग्णांची होणारी लूट आणि धावपळ थांबली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत व दिव्यांग बोर्डाच्या कामासाठी कंत्राटी क्लिनिकल सायकोलॉजीस्ट हे पद भरण्यात आले. यामुळे मानसिक रूग्णांची व्हि.एस.एम.एस. वआय.क्यू टेस्ट करण्यासाठी रूग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन ह्या टेस्ट कराव्या लागायच्या यात रूग्णांचा खूप वेळ जाऊन रूग्णांची पुन्हा ये -जा व्हायची. तसेच या प्रक्रियेमुळे हे काम २-३ दिवसांवर लोटलं जाऊन हजार दोन हजार रूपयांची आर्थीक हानी होत होती.
रुग्णांची होणारी लूट, वेळेचा अपव्यय आणि गोरगरीब रूग्णांच्या नाहक त्रासाला लक्षात घेता. जीएमसीने क्लिनीकल सायकोलॉजिस्ट म्हणून विजयेंद्र पालवे यांची मानसोपचार विभाग ओपीडी ११० ला निवड केली आहे. या टेस्ट जीएमसीत निःशुल्क सेवा केल्या. तसेच अवघ्या ४५ मिनिटाच्या कालावधीत करून रिपोर्ट दिला जातो. त्यामुळे रूग्णांची होणारी लूट व होणारी धावपळ थांबली व रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?