जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ३० वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्लम सायबू तडवी असे मृताचे नाव असून ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. मात्र, त्याने आत्महत्या का केली? हे गुलदस्त्यात आहे.
चुंचाळे येथील रहिवासी अस्लम सायबू तडवी हे शुक्रवारी घरी होते. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा सहावर्षीय मुलगा घरात आला असता त्यास अस्लम तडवी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. घाबरलेला मुलगा रडायला लागला. हा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावून गेले.
त्यांनी अस्लमला तत्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलवले. मात्र, रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. अस्लमच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. हातमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याने आत्महत्या का केली? हे कारण कळू शकले नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून चुंचाळे येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्हयातील शेतक-यांना रब्बी पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
- एकनाथ शिंदेंच्या या ३ मंत्र्यांना मिळणार डच्चू; कोण आहेत वाचा…
- Jalgaon : ढगाळ वातावरणाचा रब्बीतील ‘या’ पिकांना फटका, बळीराजा चिंतेत..
- नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लि.मध्ये १२वी पास ते पदवीधरांसाठी जम्बो भरती; आताच अर्ज करा
- अखेर महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा संपला! देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ