जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरोना तिसऱ्या लाटेच्चा वेगाने वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावल येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या वतीने आज शहरात दवंडी फिरवण्यात आली आहे. काही दिवसापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशान्वये यावल शहरात शुक्रवारी भरणारा आठवाडी बाजारासह शहरात भरणारे दैनंदिन बाजार ही उद्या १४ जानेवारी शुक्रवारपासून पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची प्रभारी मुख्याधिकारी भविनाश गांगोडे यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
- निर्यातबंदी उठताच कांद्याच्या दरात मोठी वाढ ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
- स्मिताताईंच्या प्रचारार्थ नशिराबाद येथे डॉ.केतकीताई पाटील प्रचारात सहभागी
- .. तरच मिळेल ‘तिकीट’ ; जळगाव बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्षांचा इच्छुकांना इशारा
- मलाही तुमच्या मुलीसारखं सांभाळून घ्या.. रोहिणी खडसेंचं शरद पवारांना आवाहन
- मोठी बातमी ! जळगावात बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा