⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जळगावच्या महापौरांना मिळणार शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काचे निवासस्थान!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । जळगाव शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना शहराच्या मध्यवर्ती भागात एक हक्काचे निवासस्थान असावे यासाठी महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. सोमवारी झालेल्या विशेष महासभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मनपाच्या मालकीच्या असलेल्या काही निवासस्थानांपैकी एक निवासस्थान महापौरांना मिळणार आहे.

राज्यातील काही महानगरपालिकेत महापौरांसाठी स्वतंत्र आणि शहराच्या मध्यवर्ती भागात निवासस्थान आहे. जळगाव मनपाच्या महापौरांना देखील असे स्वतंत्र निवासस्थान असावे अशी एक बाब समोर आली होती. सोमवारी पार पडलेल्या विशेष महासभेत तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. सर्वानुमते या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

जळगाव मनपाच्या मालकीचे काही निवासस्थान सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यापैकी शाहूनगरजवळ एक, मू.जे.महाविद्यालयाजवळ, जिल्हा कारागृहाच्या मागील बाजूला दोन निवासस्थान आहेत. महापौरांना यापैकी एखादे निवासस्थान महापौरांना मिळण्याची शक्यता आहे. महापौर जळगावच्या मध्यवर्ती भागात आल्याने नागरिकांना देखील

हे देखील वाचा :