जळगाव मनपाचा नवीन आकृतीबंध, पहिल्या टप्प्यात भरली जाणार ‘इतकी’ पदे
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२१ । जळगाव महापालिकेचा आकृतिबंध तब्बल २० वर्षांनंतर तयार करण्यात आला आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर पालिकेत कर्मचारी भरती हाेण्याची शक्यता असून त्यात पहिल्या टप्प्यात १५० पदे भरली जाण्याची शक्यता आहे. आकृतिबंध तयार करून १ नाेव्हेंबर २०२१ राेजी नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.
महापालिकेची स्थापना मार्च २००३ मध्ये झाली असून, १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. या संपूर्ण कालावधीत महापालिकेचा नवीन आकृतिबंध मंजूर झालेला नाही. त्यामुळे नगरपालिका असल्यापासून मंजूर पदांवर पालिकेचा कारभार सुरू आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांत दाेन वेळा आकृतिबंध तयार झाला; परंतु शासनाने मंजुरी न दिल्याने पुन्हा आकृतिबंध तयार करून १ नाेव्हेंबर २०२१ राेजी सादर करण्यात आला आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर एकूण रिक्त जागांपैकी किमान १५० जागांवर कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
नवीन ८८५ पदांची निर्मिती हाेणार
गेल्या अनेक वर्षांत गरज नसलेल्या पदांमुळे पालिकेच्या आस्थापना खर्चाचा वाढलेला भार आकृतिबंधाच्या मंजुरीनंतर कमी हाेणार आहे. मंजूर पदांपैकी १५३७ पदे व्यपगत करण्याचा निर्णय झाला आहे. मनपात नवीन ८८५ पदांची निर्मिती हाेणार आहे.
हे देखील वाचा :
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांवर भरती; 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी..
- जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीची संधी, विनापरीक्षा होणार थेट भरती
- जळगाव महावितरणमध्ये 140 जागांसाठी भरती; 10वी+ITI उत्तीर्णांना संधी, असा करा अर्ज??