जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२। एकीकडे महापरिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असताना ज्या बस सुरु आहेत त्यावर होणारे हल्ले देखील थांबत नाही. शुक्रवारी गाडेगाव घाटात रात्री ८ वाजता शिवशाही बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच.१८.बीजी.८७१ ही औरंगाबाद येथून जळगावकडे येत असतांना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फुटून नुकसान झाले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बसवाहतक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (वय-२८) रा. हिंगोणा ता.चोपडा यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गफुर तडवी करीत आहे.

हे देखील वाचा :
- Jalgaon : बस स्थानकांवर चोऱ्या करणारा सराईत अटकेत ! 3 गुन्हे उघड, लाखोंचे दागिने हस्तगत
- घर बंद करून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला! ३.२२ लाखांचा मुद्देमाल लंपास
- मुक्ताईनगरात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
- गणेशोत्सवाच्या धामधुमीत जळगाव हादरले; आईसह ५ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
- Parola : दागिन्यांच्या लालसेतून मावशीचा खून; ४० दिवसांनंतर हत्येचा उलगडा, भाच्याला अटक









