⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । मागील काही दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असता त्यात जिल्ह्यात ३० डिसेंबर रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगावचे किमान तापमान ९ अंशांवर असून, पुढील दाेन दिवस पारा १० अंशांपर्यंत राहू शकताे.

बदलत्या वातावरणामुळे एन हिवाळ्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटची राज्यातील विविध भागासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३० डिसेंबरपर्यंत तापमानात किंचित वाढ हाेईल. ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी हाेऊ शकते. ३० डिसेंबरला राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. नववर्षाचे स्वागत पावसाने हाेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

गेल्या तीन दिवसांपासून वाढ झालेल्या थंडीची तीव्रता कायम असून, गुरुवारी किमान तापमानात दाेन अंशांनी वाढ झाली आहे. ७ अंशांपर्यंत असलेले तापमान गुरुवारी ९ अंश सेल्सिअसवर हाेते. तर दिवसाच्या कमाल तापमानातही काहीसी वाढ हाेऊन तापमान ३१.४ अंशांपर्यंत वाढले हाेते.

उत्तरेतील थंड वारे राज्यात धडकल्याने जिल्ह्यात थंडीची लाट आली हाेती. थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील किमान तापमान नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी पातळीवर गेले हाेते. त्याचा परिणाम म्हणून राज्यात जळगाव सर्वाधिक कूल हाेते. थंडीच्या लाटेमुळे गारठ्याची तीव्रता तेवढीच असून, तापमानात मात्र किंचित वाढ झाली आहे. जळगावचे किमान तापमान ९ अंशांवर असून, पुढील दाेन दिवस पारा १० अंशांपर्यंत राहू शकताे.

हे देखील वाचा :