जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहराची असलेली परिस्थिती लक्षात घेता आजवर नागरिक खड्डे आणि रस्त्यांची समस्या झेलत आले आहे. जळगावकरांची सहनशिलता आता संपत आली असून शहरातील रोहित दर्डा या तरुणाने रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात सोशल मिडियात पोस्ट करीत संताप व्यक्त केला आहे. जळगावकरांनी काही दिवसांपूर्वी देखील नगरसेवकांच्या नावे जळगाव लाईव्हकडे संताप व्यक्त केला होता.
जळगाव शहरातील रस्ते तयार होणार अशी अफवा.. होत अफवाच म्हणावे लागेल कारण, जळगावकर नागरिक गेल्या ५ वर्षापासून नवीन आणि गुळगुळीत रस्ते होण्याची वाट पाहत आहेत. शहरात अटलांटा कंपनीने रस्ते तयार केले होते त्यानंतर जवळपास रस्तेच तयार झालेले नाही. त्यातच अमृत योजना आणि भूमिगत गटारीच्या कामामुळे गल्लोगल्ली खोदकाम झाल्याने रस्ते अधिकच खराब झाले. मुळात रस्ते खराब झाले असे म्हणण्यापेक्षा रस्तेच शिल्लक राहिलेले नाही. जळगाव शहर मनपाने दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार केवळ मलमपट्टीच करण्यात आली आहे. नुकतेच एक व्यक्ती देखील ठेकेदारांविरोधात न्यायालयात गेला होता. गेल्या वर्षी देखील एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु कुठेच काही सुधारणा झाली नाही.
जळगावकरांनी मनात साठवून ठेवलेला संताप बाहेर येऊ लागला असून नागरिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने ओरडू लागले आहे. शहरातील रोहित दर्डा या तरुणाने गुरुवारी सोशल मिडियात एक पोस्ट शेअर केली असून रस्त्याच्या कामाचे वाभाडे काढलेले आहेत. रोहित दर्डा याने शेअर केलेली पोस्ट पुढील प्रमाणे.. माझ जळगावची वाटचाल विकासाकडून अधोगतिकडे…नवयूगाकडुन अश्मयुगा… मागिल आठवद्दयात माज्या दुकाना समोरिल रोडाचे काम झाले पहिले रोडावर दर १०० फूटावर ५०-६० गड्ढे असा आमचा रोड होता मग मनपाला आमच्यावर दया आली त्यानी रोड बनवाला तो कसा हे फ़क्त दखवायच होत म्हनून ही पोस्ट जो जूना रोड होता त्याला पहिले एका मोठया मशीनीने ख़राब केला मग त्यावर दगडांचा थर मांडला मग ड़ामबरच पानी मरल मग त्यावर धूळवाली माती टाकली आणि निघुन गेले (रेसिपी पूर्णतः नैशनल हाइवे गाइडलाइन) आता आमच्याकडे रोडच नहिये ओर हमारे यहाँ तो मेट्रो भी नही बन रही हे…!
रोहितच्या पोस्टवर इतरांनी देखील संताप व्यक्त करणाऱ्या कमेंट केल्या आहेत. कमेंट पुढीलप्रमाणे.. स्वप्नील लोखंडे – भाऊ लोकांना समजला पाहिजे अजून झोपलेच आहेत ..कर कस भरता निवडणूक आली की पैस घेता।। कोणाला काय पडली त्याची ज्याचं जाते त्याला बोलत पण विसरून जात उद्या तुमचा वर पण वेळ येईल., दीपक पाटील – जळगांव गावात (शहर फक्त नावापुरते )सगळी कडे असेच चालू आहे सगळे राजकारणी मिळून लोकांना येड्यात काढताय, निलेश वाणी – भाऊ मोर्चा काढायचा का?, घनश्याम सोनी – जंतुपेक्षा ही जास्त खराब जनता, घे नोटा आणि बांध फेटा। अशा कमेंट नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा :