जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागात किरकोळ वादातून एकाने हवेत दोन राऊंड फायर केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी एका गटातील संशयीतांविरोधात भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील इस्लामपुरा भागात दोन जणात काहीतरी वाद झाल्याने एकाने हवेत दोन राऊंड फायर केल्याची माहिती शहरात वार्यासारखी पसरली तर या प्रकारात एकावर हल्ला करण्यात आल्याचीदेखील चर्चा आहे.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, मिलिंद भामरे, शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी यांनी धाव घेतली. दरम्यान, एका गटाविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.