आयुध प्रदर्शनात शस्त्र साहित्य पाहून नागरिक भारावले
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये १३ ते १९ डिसेंबरपर्यंत शस्त्र साहित्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी व नागरिक मिळून ७ जाहीर जणांनी भेट दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयाेजित या सात दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समाराेप झाला.
ऑर्डनस फॅक्टरीच्या कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित या प्रदर्शनात देशभरातील ॲम्युनेशन इंडिया लिमिटेड गटातील विविध आयुध निर्माणींमध्ये बनवलेले सर्व प्रकारचे दारूगोळे, मार्टर बाॅम्ब, रायफल, काडतुसे, शेल, स्मोक, सिग्नल, रॉकेट व वरणगाव आयुध निर्माणीत बनवल्या जाणाऱ्या ५.५६,७.६२ व १२.७ एमएम या ऑम्युनेशन बंदुकीच्या गोळ्या पाहण्यासाठी ठेवल्या होत्या. सोबत कॅटलाॅगवर माहिती उपलब्ध होती. फायर ब्रिगेडची उपकरणे व त्याबद्दल माहिती प्रात्यक्षिकानुसार सांगितली जात होती. वरणगाव फॅक्टरी येथे निर्माणीचे महाप्रबंधक पी.सी.नंदा, नोडल ऑफिसर ए.के.वसू व व्ही.व्ही. वासनिक यांच्या मार्गदर्शनात आयोजित प्रदर्शनाला जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी,आदींसह ७ हजारांवर नागरिकांनी भेट दिली. विशेष म्हणजे या प्रदर्शनात दुसऱ्या फॅक्टरींमध्ये निर्मित उत्पादनांची माहिती योग्य पद्धतीने करून देण्यात आली.
प्रदर्शन यशस्वितेसाठी आयुध निर्माणीचे कनिष्ठ कार्य प्रबंधक एन.एन.गायकवाड, सचिन कांबळे, मनोहर लोणे, अमोल पाटील, व्ही.के.कोल्हे, प्रदीप पाटील, गणेश टेमकर, टी.जी. पिल्ले, के.बी. इंगळे, एन.पी.वाघ, आर.बी.जगताप, सचिन सोनार, सोमू प्रधान, मिलिंद पाटील, अंबादास भलभले, संजय निकम, फायर ब्रिगेड विभागाचे कांबळे, माणिक धाबर्डे, हेमंत जोशी, डेनिस, शरद चौहान, दीपक सुरवाडे, महेंद्र पाटील, डी.ए.देवरे, जॉन टेन्ट यांचे सहकार्य लाभले.
हे देखील वाचा :
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
- Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
- वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ व्या राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ