जळगाव जिल्हाजळगाव शहर
हद्दपार आरोपीला जुने बसस्थानक परिसरातून अटक; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला आरोपी शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांना जुन्या बसस्थानकाच्या परिसरात फिरताना आढळून आला.संदीप मधुकर निकम (वय २५,रा.गेंदालाल मिल) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप निकम याला पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.परंतु, शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांना संदीप हा जुने बसस्थानक परिसरात आढळून आला. त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किशोर निकुंभ करीत आहेत.