⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर परिसरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे फळे, ब्लॅंकेटचे वाटप

अमळनेर परिसरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे फळे, ब्लॅंकेटचे वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाचे अवचित साधत अमळनेर परिसरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे तसेच आ.अनिल पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळे व गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्हा अल्पसंख्यांकाचे चिटणीस एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अल्पसंख्यांकांचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा उपाध्यक्ष अलाउद्दीन शेख चिरागोदिन, मार्केटच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रिता बाविस्कर, शिवाजी पाटील, पदवीधर मतदार संघाचे कार्याध्यक्ष संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष लतीफ पठाण, मांडळचे सरपंच नारायण कोळी, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अभीद शेख, वसीम पठाण, बाबू शेख, रफिक शेख, मुशीर शेख व सैय्यद शाह यांनी परिश्रम घेतले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.