कोरपावली येथे कोविड १९ कोविडशिल्ड लसिकरण संपन्न

डिसेंबर 14, 2021 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरोना चा आलेख जर उतारतीकडे असला तरी देखील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण करणे महत्वाचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील कोरपावली येथील ग्राप पंचायत मध्ये सुरू असलेल्या कोविड 19 या प्रतिबंधक लसीकरण ठिकाणी माजी सरपंच तथा जळगाव जिल्हाध्यक्ष काँग्रेस ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल यांनी भेट देत पाहणी केली.

lasikarn jpg webp

लसीकरणाची माहिती घेत व ज्यांनी अजून लसीकरण करून घेतले नाही त्यांनी लवकरच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. डॉ. गौरव भोईटे सौखेडा प्रा. आरोग्यकेंद्र यांनी सदर माहिती दिली त्यानुसार कोरपावली येथे 2361 मधून 2120 लोकांनी पहिला डोस म्हणजे 91% लसीकरण झाल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामसेवक प्रवीण कोळी,समाजसेवक मुक्तार पटेल, ग्राप सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, सिकंदर तडवी, उपस्थित होते सदर लसीकरण मोहिमेसाठी (सी एच ओ) डॉ. राहुल गजरे, एस. एच. चौधरी, आरोग्यसेवक ए.जी.नाले, आशा वर्कर, शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका ग्राप कर्मचारी सह सर्वच परिश्रम घेत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now