⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | आवर्तन सोडून देखील हतनूर धरण फुल्ल

आवर्तन सोडून देखील हतनूर धरण फुल्ल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ ।  हतनूर धरणातून रब्बीसाठी ५०० क्युमेक्स आवर्तन सोडण्यात आले. यानंतरही धरणात दररोज ०.५ दलघमी पाण्याची दैनंदिन आवक कायम असल्याने १०० टक्के साठा शिल्लक आहे. याच आवकमधून रब्बीसाठी पहिले आवर्तन देण्यात आले.

हतनूर धरणात यंदा ऑक्टोबर महिन्यातच १०० टक्के साठा झाला. यानंतर तापीपात्रात विसर्ग केला जात होता. आताही धरणात दररोज ०.५ दलघमी आवक होत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी धरणातून तीन दिवस ५०० क्युमेक्सचे पहिले आवर्तन देण्यात आले. उजव्या तट कालव्यातून सोडलेल्या या आवर्तनामुळे यावल व चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण झाली. मात्र, धरणात अद्यापही आवक कायम असल्याने ५०० क्युसेसचे पहिले आवर्तन देवूनही धरणात १०० टक्के साठा शिल्लक आहे. ही आवक अजून आठ दिवस चालेल असा अंदाज आहे. तसेच गेल्या पंधरवड्यात हतनूरचा एक दरवाजा अर्धा मीटरने उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू होता. मात्र, आता तो बंद करण्यात आला.

परिणामी तापीतून विसर्ग कमी झाल्याने दीपनगर, रेल्वे, भुसावळ नगरपालिका, एमआयडीसी जळगाव यांच्या तापी बंधाऱ्यातील पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे जानेवारीत आवर्तनाची मागणी होऊ शकते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.