जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । वाळूने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात आयशर गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी आयशर गाडीच्या चालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे कि बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील अमोल रामदास जाधव (वय-३२) हे (एमएच २८ बीबी ३७४१) या क्रमांकाच्या ट्रकमध्ये गुजरातेतून रीतसर पावतीने वाळू भरून बुलढाणा येथे येत असताना नेरी येथे एक समोरून आयशर गाडी क्रमांक (एमएच ०५ के ९६६४) वरील चालकाने याने आयशर गाडीने ओव्हरटेक करत असतांना ट्रकच्या साईडला गाडीला जोरदार धडक दिली.
यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालक अमोल रामदास जाधव यांच्या फिर्यादीवरून आयशर गाडी क्रमांक (एमएच ०५ के ९६६४) वरील चालका विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.