महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या गव्हर्निंग काैन्सिलवर संगीता पाटील, नितीन इंगळे, संजय दादलिका
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । महाराष्ट्राच्या व्यापार – उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन गेल्या ९५ वर्षापासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या द्विवार्षिक निवडणुकीत ‘अध्यक्षपदी’ ललित गांधी (कोल्हापुर) यांची बिनविरोध निवड झाली असुन वरिष्ठ उपाध्यक्षपदी उमेश दाशरथी (औरंगाबाद) यांची बिनविरोध निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातुन गव्हर्निंग कॉऊन्सीलवर संगीता पाटील, नितीन इंगळे, संजय दादलिका यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेल’ चे व्यवस्थापन समितितील ६ पैकी ५ उमेदवार व गव्हर्निंग कॉऊन्सील मधील ९१ पैकी ७० उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजकांसाठी ब्रिटीशांशी संघर्ष करणारे व भारताची पहिली स्वदेशी मोटार, पहिले स्वदेशी जहाज व पहिले स्वदेशी विमान निर्माण करणारे दृष्टे उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील लोकांना उद्योग व व्यापारात येण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी १९२७ साली “ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर ” ची स्थापना केली वालचंद हिराचंद यांनी त्यांचे सहकारी आबासाहेब गरवारे, शंतनुराव किर्लोस्कर, बाबासाहेब डहाणुकर यांच्या सोबतीने महाराष्ट्रभर दौरे करून महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पाया रचला.
औद्योगिक सहकारी वसाहतींची स्थापना, अनेक नवीन रेल्वे सेवा विमान सेवा यांच्या सुरूवातीबरोबरच राज्यातील जकात रद्द करणे, विविध कर सुधारणा, उद्योग धोरणातील सुधारणा, निर्यात वृध्दीसाठी प्रोत्साहन योजना यासाठी चेंबरने यशस्वी कार्य केले आहे.
राज्यातील ५५० हुन अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना तसेच चार हजार हुन अधिक व्यापारी, उद्योजक चेंबरशी संलग्न असुन, ५५० संलग्न सभासदांच्या माध्यमातुन चेंबर राज्यातील ७ व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधीत्व व नेतृत्व करीत आहे. लाख
या संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक व शेतकरी यांच्या विकासासाठी संपुर्ण कार्यकारीणीसह कार्यरत राहु अशी ग्वाही ललित गांधी यांनी यावेळी दिली.बिनविरोध निवड झाल्याबद्दल चेंबरचे वरिष्ठ व केट असोसिएशनचे राज्यउपाध्यक्ष दिलीप गांधी, पुरूषोत्तम टावरी, सुरेश टाटिया तसेच सर्व चेंबरचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.