जळगाव जिल्हाजळगाव शहर
सुप्रीम कॉलनीतील तरुणाची आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । शहरातील सुप्रिम कॉलनील येथील बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह आज सकाळी सात वाजेच्या सुमारास मेहरूण तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, महेंद्र हिम्मत पाटील (वय-३३) रा. गजानन मंदीराजवळ सुप्रिम कॉलनी जळगाव हा आई, पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहे. १७ नोव्हेंबर रोजी महेंद्र पाटील हे दुपारी २ वाजता कामाच्या ठिकाणी जावून येतो असे सांगून दुचाकी घेवून गेला. सायंकाळ झाली परंतू मुलगा घरी आला नसल्याने आई व पत्नी यांनी शोधाशोध केली. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज मेहरूण तालावात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहेकॉ संजय धनगर, महेंद्रसिंग पाटील, पोहेकॉ सचिन मुंढे, मुकेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
महेंद्र पाटील यांचा मृतहेद असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.