जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । मोहाडी येथे सुकलाल भास्कर सपकाळे (वय ३५,) यांनी घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समलेले नाही. याप्रकणी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, सुकलाल सपकाळे कंपनीत कामाला होते. बुधवारी ते कामावर गेले नाही. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आई लताबाई वरच्या घरात गेली असता, सुकलाल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाला अशा परिस्थितीत पाहताच लताबाई यांनी हंबरडा फोडला. सपकाळे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. खालिदा पठाण यांनी मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अतुल पाटील, शुध्दोधन ढवळे यांनी पंचनामा केला.
सपकाळे यांच्या पश्चात आई लताबाई, वडील भास्कर देवराम सपकाळे, लहान भाऊ रवींद्र, पत्नी माया, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.