जळगाव जिल्हा

समता परिषदेच्या मेळाव्यात तीन विभागांची कार्यकारिणी जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । समता शिक्षक परिषदेचा मेळावा रविवार दि.१४ रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडला. मेळाव्यात तीन विभागांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे राज्यनेते सूर्यकांत गरुड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी खलिल शेख, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, कास्ट्राईबचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरळकर, ज्येष्ठ मार्गदर्शक धनराज मोतीराय आदी उपस्थित होते.

अशी आहे कार्यकारिणी
मेळाव्यात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जळगाव जिल्हा पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी रणजित सोनवणे (वडगाव बु., ता. भडगाव), पूर्व विभाग अध्यक्षपदी मनीषा देशमुख (भुसावळ), जिल्हाध्यक्षपदी मनोज नन्नवरे (पाळधी, ता.धरणगाव), राज्य उपाध्यक्षपदी रावसाहेब जगताप (शिरसगाव ता. चाळीसगाव), खान्देश विभागीय अध्यक्षपदी बी.एन. पाटील (भातखंडे, ता.भडगाव), संघटनेच्या विविध विभागाच्या उपाध्यक्षपदी प्रवीण केदार, सपना रावलानी, विनोद सपकाळे, हेमेंद्र सपकाळे, गणेश बच्छाव, सरिता वासवानी, एम.पी. कोळी, डी.बी. पाटील, अश्विनी कोळी, विविध विभागाच्या कार्याध्यक्षपदी युवराज सोनवणे (साकळी, ता. यावल), प्रा. सुरळकर (यावल), डी.डी. सुरवाडे (पाचाेरा), विभागीय कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी डी.के. पाटील (आडगाव), एस.आर. महाजन (जळगाव), रंजना इंगळे (बोदवड) आदींची निवड करण्यात आली. मेळाव्याचे सूत्रसंचालन मनोज नन्नवरे, अजय भामरे, सरिता वासवानी, रंजना इंगळे यांनी केले तर आभार माध्यमिकचे अध्यक्ष रणजित सोनवणे यांनी मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button