जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । सणासुदीचा काळात मागणी वाढल्याने सोने-चांदीच्या दरात सतत वाढ होतांना दिसून येत होती. सोमवारपर्यंत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ५०,४७० तर चांदी ६८,७२० रुपयांवर पोहोचली होती. मंगळवारी सोने व चांदीच्या दरात काही अंशी घसरण झाली. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅमसाठी २० रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलोसाठी ६०० रुपयांनी घसरण झाली.
माय गोल्ड सिल्वर या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार जळगाव सराफ बाजारात आज (दि.१६) रोजी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅमसाठी २० रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलोसाठी ६०० रुपयांनी घसरण झाली. त्यानुसार सोने ५०,४५० रुपयावर तर चांदी ६८,१२० रुपयांवर पोहोचली आहे. लग्नसराईला सुरुवात झालेली असल्याने सोने-चांदीची मागणी वाढली आहे. असे असतानाही मंगळवारी सोने व चांदीच्या दरात घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे.
असे होते मागील काही दिवसांचे दर
मागील काही दिवसात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोमवार दि.८ नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर ४९,१००, मंगळवार दि.९ नोव्हेंबर रोजी ४९,१४०, बुधवार दि.१० नोव्हेंबर रोजी ४९,४२०, गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी ५०,०००, शुक्रवार दि.१२ नोव्हेंबर रोजी ५०,३७० तर सोमवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सोने प्रति १० ग्रॅमसाठी ५०,४७० रुपयांवर पोहोचले होते.