जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला किरण खर्चे (वय २७,) याला सोमवारी न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. असल्याचे न्या.व्ही.एन. मुगळीकर यांनी हा निकाल दिला.
सविस्तर असे की, किरण शंकर खर्चे (वय २७, रा. सुप्रीम कॉलनी) हा दोन वर्षासाठी हद्दपार असताना २१ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकात हातात शस्त्र घेऊन दहशत माजवित होता. हद्दपार आदेशाचे उल्लंघन व शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्या विरुध्द विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपासी अमलदार जितेंद्र राजपूत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते. न्या. व्ही. एन. मुगळीकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात तीन साक्षीदार तपासले सरकारी वकील रंजना पाटील यांनी साक्ष, पुरावे तसेच आरोपीवर यापूर्वी असलेले गुन्हे यावर प्रभावी युक्तीवाद करुन शिक्षेची मागणी केली. न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.