जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात शिवसेनेकडून भाजला एकामागोमाग धक्के दिले जात असून आता पाचोरा शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती शिवबंधन बांधले आहे.
यांनी केला प्रवेश
माजी नगरसेवक तथा पाचोरा शहर भाजपाचे उपाध्यक्ष देवराम लोणारी, भाजपा मच्छीमार सोसायटी अध्यक्ष युवराज भोई, भाजपा ओ. बी. सी. सेल अध्यक्ष अजय सोनार, भा.ज.पा. उपाध्यक्ष पाचोरा शहर रघुनाथ कुमावत आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे , नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपजिल्हाप्रमुख अॅड. दिनकर देवरे, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख बंडू चौधरी आदी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.