जळगाव शहर

जळगाव विमानतळाचे होणार खासगीकरण, रायपूरसोबत जोडणार विमानतळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) मालकीच्या १३ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे यात सात लहान विमानतळांमध्ये जळगावचा समावेश आहे. त्यामुळे जळगावला रायपूरसोबत जोडले जाणार आहे.

‘एएआय’चे अध्यक्ष संजीवकुमार यांनी सांगितले की, आम्ही विमान वाहतूक मंत्रालयाला १३ विमानतळांची यादी पाठविली आहे. या विमानतळांसाठी सरकारी खासगी भागीदारी तत्त्वावर बोली लावली जाणार आहे. चालू वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत या विमानतळांची बोली प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे.

या विमानतळांचे होणार निवडण्यात आलेल्या १३ विमानतळांपैकी भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, त्रिची, इंदौर आणि रायपूर हे सहा विमानतळ मोठे आहेत. तसेच झारसुगुडा, गया, कुशीनगर, कांगडा, तिरुपती, जबलपूर आणि जळगाव हे सात विमानतळ छोटे आहेत. मोठ्या खासगीकरण खासगीकरणासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी छोट्या विमानतळांना मोठ्या विमानतळांशी जोडण्यात येणार आहे. यात झारसुगुडा विमानतळास भुवनेश्वर विमानतळाशी जोडले जाईल. कुशीनगर व गया कांगडाला अमृतसरसोबत, जबलपूरला इंदौरसोबत, जळगावला रायपूरसोबत आणि तिरूपतीला त्रिचीसोबत जोडले जाईल.

विमानतळांना वाराणसीसोबत, सूत्रांनी सांगितले की, आगामी चार वर्षात आणखी २५ विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. यातून सरकारला मोठा महसूल मिळेल. याआधी दिल्ली, मुंबई, बंगलोर आणि हैदराबाद येथील विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button