धक्कादायक : दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार, संशयित नराधम ताब्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव तालुक्यातील एका गावात दोन चिमुकल्या बहिणींवर तरुणाने लैगिंग अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित नराधम तरुणास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत असे कि, तालुक्यातील एका गावात दोन्ही चिमुकल्या मुली कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवार, २० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्य सुमारास गावातच राहणारा तरुण मुलींच्या घरी गेल्या. यादरम्यान त्याने दोघां चिमुकल्या बहिणीसोबत अश्लिल चाळे करत दोघांवर लैगिंक अत्याचार केला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी नशीराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तक्रारीवरुन याप्रकरणी अत्याचारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे करीत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत संशयित तरुणास न्यायालयात हजर करण्याची कारवाई सुरु होती.