जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । १८३३ पासूनची रथोत्सवाची परंपरा यंदाही अखंड ठेवत आश्विन शुद्ध एकादशीला शनिवार दि.१६ रोजी बहाळ येथील पांडुरंग महाराजांचा रथ पाच पावले ओढून रथाेत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बहाळ येथील पांडुरंग महाराज रथोत्सव गतवर्षीप्रमाणे या वर्षीही स्थगित करण्यात आला होता. १८३३ पासूनची रथोत्सवाची परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून शनिवार दि.१६ रोजी रथ पाच पाऊले ओढून रथोत्सव साजरा करण्यात आला. बाळकृष्ण ब्राह्मणकार, वासुदेव ब्राह्मणकार, सरपंच राजेंद्र मोरे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष भोई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा रथोत्सव संपन्न झाला. विधिवत पूजेनंतर श्री पांडुरंग महाराजांची मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली. गावातील भाविकांनी पूजन केले. जिल्ह्यात पाच ठिकाणी रथाेत्सव साजरा करण्यात येतो. सर्वत्र बालाजींचा रथाेत्सव साजरा होताे. मात्र बहाळला पांडुरंग महाराजांचा रथाेत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी रथाचे मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत मंदिर प्रांगणात आरती करण्यात आली. त्यानंतर १० फूट रथ ओढण्यात आला. यावेळी पांडुरंग महाराजांचा मोठ्या उत्साहात जयघोष करण्यात आला. रथ फळाफुलांनी सजवण्यात आला हाेता. रथावर रोषणाई करून जागेवरच भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. श्रद्धास्थान असलेल्या पांडुरंग महाराजांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी माजी सभापती स्मितल बोरसे, सरपंच राजेंद्र मोरे, दिनेश बोरसे, मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष भोई, उपाध्यक्ष अरुण कोठावदे, सचिव गणेश सोनार, सदस्य सुनील करनकाळ, वैभव पिंगळे, अनिल पाटील, एकनाथ कोळी, भीमसिंग परदेशी, भावडू महाजन, गोविंद परदेशी, ग्रामपंचायत सदस्य असिफ मण्यार, राकेश शिरुडे, नाना भोई, दिलीप मोरे, रमेश महाजन, दशरथ मोरे, कैलास शिंपी, जगदीश पगारे, संतोष अहिरे, विनोद चौधरी, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष कांतीलाल कोळी, प्रकाश ठाकूर, रवींद्र बोरसे, विजय महाजन आदी उपस्थित होते. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले, सहाय्यक फौजदार धर्मराज पाटील, जितू परदेशी, पोलिस नाईक सिद्धांत सिसोदे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.