जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर.एल. शिंदे यांनी गुरूवार दि.१४ रोजी पदभार स्वीकारला.
प्रभारी कुलसचिव डॉ. एस.आर. भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव पदाचा राजीनामा गेल्या आठवड्यात दिला होता. हा राजीनामा प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांनी स्वीकारला व प्रा. आर.एल. शिंदे यांची प्रभारी कुलसचिव म्हणून कुलगुरूंनी नियुक्ती केली. डॉ. शिंदे यांनी पदभार घेतला त्यावेळी प्रभारी प्र. कुलगुरू प्रा. बी.व्ही. पवार, प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. मधुलिका सोनवणे, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक प्रा. के.एफ. पवार, डॉ. एस.आर. भादलीकर, सहायक कुलसचिव व्ही.व्ही. तळेले आदी उपस्थित होते.
डॉ. आर.एल. शिंदे हे विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेत संख्याशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून यापुर्वी या प्रशाळेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २८ वर्षाचा त्यांना अध्यापनाचा अनुभव असून विविध प्राधिकरणे व समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे. सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोध निबंध प्रकाशित झालेले आहे.