जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । नशिराबाद सेनेच्या शहरप्रमुख विकासभाऊ धनगर यांच्या वाढदिवसाचे औचित साधून, सेनेच्या शाखेतर्फे आजपासून मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ते १४ ऑक्टोबर अखेर सुरु राहील.
मतदार नोंदणीसाठी पासपोर्ट आकारातील छायाचित्र, ओळखपत्रासाठी पॅनकार्ड, जन्माचा दाखला, आधार कार्ड, वाहन परवाना, तसेच रहिवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वीजबिल, मालमत्ता कर पावती, बँक पासबुक, गॅस पुस्तिका, व दूरध्वनी बिल यांपैकी एक हवे. नवविवाहित महिलांसाठी लग्नपत्रिका, विवाह नोंदणी दाखल यांपैकी एक आवश्यक राहील. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सेनेतर्फे करण्यात आले .
या अभियानाचा प्रारंभ नशिराबाद येथील बसस्थानकाजवळील शिवसेना कार्यालयात झाला. याप्रसंगी माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख विकास धनगर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दगडू माळी, चंदू भोळे, युवासेनेचे शाखाप्रमुख चेतन बर्हाटे, संदीप पाटील, भूषण कोल्हे, कैलास नेरकर, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखे, प्रभाकर महाजन, उल्हास चौधरी आदी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.