⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जिल्हा बँक निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला, वाचा कुणाला किती जागा मिळणार

जिल्हा बँक निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला, वाचा कुणाला किती जागा मिळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्व पक्षीय पॅनलच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर समितीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला असून याबाबत उद्या अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. प्रशासनासह सर्व पक्षीयांकडूनही तयारी सुरु करण्यात आली आहे. सर्वपक्षीय पॅनलसाठीच्या घडामोडींनाही वेग आला असून यासंदर्भात नुकतीच गुलाबराव देवकर वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यानंतर शनिवार दि.९ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. चिमणराव पाटील, आ. राजूमामा भोळे, माजी आ. गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आ. शिरीष चौधरी, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी नेत्यांची उपस्थिती होती.

असा आहे फॉर्मुला?
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठक सुरू असतांनाच आगामी निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी सात जागा तर शिवसेनेला पाच आणि कॉंग्रेसला दोन जागा देण्यावर एकमत माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, याफॉर्म्युल्याबाबत प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन याबाबत उद्या अधिकृत घोषणा करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.