जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । भारतीय स्टेट बँक अर्थात SBI मध्ये खाते असणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुमचे SBI मध्ये खाते असेल तर बँकेने तुमच्यासाठी अलर्ट जारी केला आहे. शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम करणार नाही, अशी माहिती बँकेने ट्विट करून ग्राहकांना दिली आहे.
तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा ९, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी बँकांकडून तांत्रिक सुधारणा केल्या जात असतात. जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा सहज मिळतील.
या वेळेत राहणार सेवा बंद?
एसबीआयच्या माहितीनुसार, या सेवा ९ ऑक्टोबरच्या रात्री १२:२० ते ०२:२० पर्यंत बंद राहतील. १० आणि १० ऑक्टोबर रोजी रात्री ११:२० ते १:२० पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत. या दरम्यान, UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद केले जातील. एसबीआयमध्ये योनोचे ३.४५ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि दररोज सुमारे ९० लाख लॉगिन केले जातात. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत एसबीआयने योनोच्या माध्यमातून १५ लाखांहून अधिक खाती उघडली आहेत.