जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । युवकांनी वाचन कट्ट्याचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन मुख्याध्यापिका साधना लोखंडे यांनी केले. मोहाडी येथील कै. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालयात ‘बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा’चे उद्घाटन मुख्याध्यापिका साधना लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाने दत्तकगाव मोहाडी (ता. जि.जळगाव) येथील कै. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी “बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा” सुरु करण्यात आला. या वाचन कट्ट्याचे उद्घाटन नुकतेच झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वंदना चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका साधना लोखंडे ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. वंदना चौधरी यांनी अपल्या भाषणात, सर्व विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती रुजविणे महत्वाचे आहे. आणि म्हणूनच त्यांच्यातील वाचन संस्कृती लुप्त होऊ नये यासाठी महाविद्यालयाच्यावतीने वाचन कट्टा सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण कोल्हे व डॉ. वंदना चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे यशश्वीतेसाठी केसीई जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, प्रा.अतुल गोरडे, मोहन चौधरी, संजय जुमनाखे, निलेश नाईक, विजय चव्हाण, केतन पाटील यांनी सहकार्य केले.