जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव शहरामधून अल्पवयीन मुलास पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनीत राहणारे शेख साखीर शेख कासम यांचा मुलगा सोनू शेख साखीर(14) हा 4 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजता घरच्यांना सांगून बाहेर खेळायला गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही. दरम्यान घरच्यांची धाकधूक वाढली आणि घरच्या व्यक्तींनी परिसरात त्याचा शोध सुरु केला. नातेवाईकांना देखील फोनवर त्याबाबत विचारणा केली। परंतु सोनू शेख याचा कोठेही तपास लागला नाही. त्यामुळे आपल्या मुलास कोणीतरी फूस लावून पळविले आहे याची खात्री शेख साखीर शेख कासम यांना झाली. आणि त्यांनी ताबडतोब चाळीसगाव पोलिस स्टेशन गाठले.
दरम्यान शेख साखीर शेख कासम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्थानकात भादंवि कलम 363 प्रमाणे अज्ञात इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरारी हे करीत आहेत.