जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । बंजारा समाजातील लोककला व पारंपारिक कलागुणांना वाव देण्यासाठी काम करणाऱ्या बंजारा कलावंत सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी गोर कलावंत मोरसिंग राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल राठोड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
मोरसिंग राठोड हे बंजारा समाजातील लोककला व लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करतात. महाराष्ट्र शासनाने त्यांची लोककलावंत म्हणून निवड देखील केली आहे. शासनाच्या जनजागृती अभियानात त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती केली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने त्यांची जनजागृतीसाठी नियुक्ती केली होती. बंजारा समाजातील लोककला जिवंत ठेवण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.