जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । शिक्षक सेनेची बैठक दि.३ रोजी (सावदा ता. रावेर) येथील विश्रामगृहात पार पडली. बैठकीत शिक्षक सेनेची रावेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जिल्हा सरचिटणीस नाना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार, चोपडा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, यावल तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जळगाव तालुका सरचिटणीस निळूभाऊ चौधरी, जळगाव तालुका कोषाध्यक्ष अनिल महाजन, धरणगाव तालुका अध्यक्ष रमेश बोरसे, यावल तालुका सरचिटणीस अजित तडवी, एरंडोल तालुका अध्यक्ष सचिन सरकटे, एरंडोल तालुका कोषाध्यक्ष सतीश महाजन, एरंडोल तालुका उपाध्यक्ष भूषण पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अशी आहे रावेर तालुका कार्यकारणी
तालुकाध्यक्षपदी पवन बाऱ्हे, तालुका सरचिटणीसपदी स्वातेश सरोदे, तालुका कार्याध्यक्षपदी हरीश वाणी, तालुका कोषाध्यक्षपदी युवराज महाजन, तालुका उपाध्यक्षपदी राहुल अवसरमल, सहसचिवपदी अमोल पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून गुंजन पाटील, सुनीता बेंडाळे, दिपाली पाटील, तालुका संघटकपदी मेहराम जाधव, प्रफुल्ल पाटील, निलेश सपकाळे, बापू भोळे, खंडू भिल, साजिद तडवी, चेतन खोंडे आदींची निवड करण्यात आली. प्रास्तविक नाना पाटील यांनी तर सूत्रसंचालन दत्तात्रय तायडे यांनी केले. संदीप पवार यांनी संघटनेचे महत्व आणि कार्य याबद्दल मार्गदर्शन केले. हरीश बोंडे, प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र वंजारी, नवल चौधरी, गोकूळ भोई आदींचे सहकार्य लाभले.