बातम्या
पंचायत राज समिती सदस्यांनी घेतली खडसेंची भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समिती मधील सदस्य आ. प्रदिप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, आ. अमरनाथ राजूरकर यांनी एकनाथराव खडसे यांची मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी एकनाथराव खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, मुक्ताईनगर गटविकास अधिकारी नागटिळक यांच्यासह आदींची उपस्थिती होती.