जळगाव जिल्हाजळगाव शहर

आयएमआर रोटरॅक्टच्या अध्यक्षपदी अक्षद तर सचिवपदी संजना नाईक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २७ सप्टेंबर २०२१ | आय एम आर रोटरॅक्ट चे प्रेसिडेंट प्रणिलसिंग चौधरी, सेक्रेटरी स्वप्निल खडसे यांनी आपला पदभार नवीन प्रेसिडेंट अक्षत आणि सेक्रेटरी संजना नाईक यांना सोपविला.याप्रसंगी आर एम आर डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे,रोटरी प्रेसिडेंट संदिप शर्मा सेक्रेटरी मनोज जोशी,आर आर सी प्रा शुभदा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना प्रणिलसिंग चौधरी यांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी पॅन्डॅमिक मध्यें फार कमी इव्हेंट घेता आले याची खंत व्यक्त करतांना, पॅन्डॅमिक काळात आरोग्य सेवेला हातभार लावता आला, वेळ प्रसंगी मदतीला धावून जाता आले , हे प्रचंड समाधान मिळाले.

त्यानंतर प्रणिलसिंग चौधरी यांनी चार्टर्ड अक्षत बेंद्रे यांना सुपूर्द केला. तसेच नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये समाविष्ट रो.सयाजी जाधव,रो. वेदांत दुसाने, रो. वैष्णवी भंडारकर यांचा सत्कार केला.

अध्यक्षीय भाषणात प्रा शिल्पा बेंडाळे यांनी सांगितले की,”तुमच्या व्यक्तिगत विकासासाठी रोटरॅक्ट सारखा सोर्स फार महत्त्वाचा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी ते अनुभव घेते आहे. आणि आता पॅन्डॅमिक काळातून बाहेर पडण्यासाठी या सोर्सचा जरुर उपयोग करून घ्या. तुमच्या सुप्त गुणांना जास्तीत जास्त वाव द्या. तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही कुठे पोहोचायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे.”

या कार्यक्रमात आय एम आर मध्ये 15 आगस्ट निमीत्ताने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखिल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. विजेते स्पर्धक , प्रथम पारितोषिक, आकाश सोनवणे, द्वितीय पारितोषिक, संजना इंगळे, तॄतीय पारितोषिक,वंशीता भाटिया, ह्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आलीत. त्यांनंतर गणपती पेंटिंग स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला.त्यात विजय चौधरी प्रथम, आकांक्षा पाटील, द्वितीय, नेहा योगेश चौधरी,तॄतिय ठरलेत.तर गणपती डेकोरेशन स्पर्धेचा निकाल, उत्कर्षा सुर्यवंशी प्रथम,अनुषा मिश्रा द्वितीय, एकता पाटील तॄतिय ठरलेत. या स्पर्धांचे बक्षीस वितरण देखिल याप्रसंगी पार पडले

त्यानंतर बोलतांना रोटरी प्रेसिडेंट संदिप शर्मा यांनी नवीन रोटरॅक्टर्सला मार्गदर्शन केले. रोटरॅक्ट क्लबच्या कामाविषयी माहिती दिली. रोटरॅक्टर्सला संबोधित करतांना रो.डॉ. शमा सुबोध यांनी, यापुढे न्यू नाॅर्मल मध्ये प्रवेश करतांना वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी विचार करा.असे सांगून सर्व रोटरॅक्टर्सला शुभेच्छा दिल्यात. रो.प्रा शुभदा कुलकर्णी यांनी , सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला रो. अशोक जोशी, रो. स्वाती ढाके, रो. पंकज व्यवहारे आणि अनेक रोटरॅक्टर्स आणि रोटेरिअन उपस्थित होते. रोटरॅक्टर् शिवानी चौधरी हिने सुत्रसंचलन केले. .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button