जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । भारतीय थोर महिला क्रांतिकारक मादाम कामा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक कर्तुत्ववान कामगिरी बजावली आहे. मादाम कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला होता व त्यांचे माहेरचे संपूर्ण नाव भिकाजी सोराब पटेल असे होते. मादाम कामा यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले व पुढील प्रमाणे अनेक कर्तृत्वान कामगिरी बजावली आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई शहरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता. या भयानक संसर्गजन्य रोगाला जेव्हा अनेक लोक बळी पडू लागले तेव्हा आपल्या प्राणाची पर्वा न करता रोग्यांच्या सेवाकार्यात भिकाजी कामा यांनी स्वतःला झोकून दिले. परिणामी त्यांना स्वतःलाही त्या रोगाची लागण झाली सुदैवाने त्या वाचल्या. हवापालट व विश्रांतीसाठी त्यांच्या सुहृदांनी-नातेवाईकांनी त्यांना इ. स. १९०२ मध्ये यूरोपला पाठविले जर्मनी, स्कॉटलंड आणि फ्रान्स या देशांत प्रत्येकी एकेक वर्ष राहून इ.स. १९०५ मध्ये मॅडम कामा लंडनला आल्या.
मादाम कामा यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते मादाम कामा यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून झाल्याने इंग्रजी बाबतची त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. एक सामाजिक कार्यकर्ते व वकील रुस्तम कामत यांच्याशी मादाम कामा यांचा विवाह झाला होता. मादाम कामा यांच्या कार्यामध्ये त्यांनी दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. सोबतच युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन देखील सुरू केले. त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. ‘सावकरांचे १८५७ चा स्वातंत्र लढा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम कामांनी त्यांना मदत केली. त्या स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत करत असे. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी परिधान करून व भारतीय झेंडा घेऊन या परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली.
त्या फडकावलेल्या झेंड्यात हिरवा, पिवळा व लाल रंगाचे पट्टे होते. यातील लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. ‘वन्दे मातरम्’ हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्ट येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामांनी हि माहिती दिली होती.
मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव देखील दिले आहे.
मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारणइ.स. १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. १९ आगस्ट, इ.स. १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.