जळगाव जिल्हा

अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघाच्या १०० शाखांचे अनावरण होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या गावोगावी शाखा तयार करणे व समाजकार्याची पद्धत यासह विविध विषयांवर नुकत्याच झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.

भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये महासंघाच्या २० शाखा युवकांनी तयार केलेल्या असुन लवकरच त्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत १०० शाखांचे अनावरण करण्याचे महासंघाचे नियोजन व उद्दिष्ट असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे यांची भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अक्षय दिलीप बेंडाळे, ऋषिकेश कोलते, आकाश डिंगबर पाटील, रोशन अरुण इंगळे, सागर उद्धव पाटील, मयूर अनिल इंगळे, विशाल विनोद पाटील, प्रदीप रमेश वारके, कुणाल सुरेश नेमाडे, नरेंद्र पुरुषोत्तम पाटील, शुभम ज्ञानदेव पाटील, रुपेश अरुण पाटील, प्रतीक संजय इंगळे, प्रणव निलेश पाटील, लोकेश सुधाकर पाटील, संकेत संतोष वारके, प्रवीण मधुकर इंगळे, प्रथमेश यादव पाटील, जितेंद्र शेणफळू पाटील, ऋषिकेश विजय पाटील, विशाल सुरेश नेमाडे, विष्णू इंगळे, चेतन रवींद्र भोळे, कल्पेश उखर्डू पाटील, लोकेश राजेंद्र खाचणे, शुभम किशोर खर्चे, दशरथ दिलीप पाटील, गोविंदा जनार्धन पाटील, देवेंद्र विष्णू इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋषिकेश कोलते यांनी केले तर आभार अमोल कोल्हे यांनी मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button