जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवार दि. १७ रोजी जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडली. बैठकीत जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील हे होते, तर उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रदेश कार्याध्यक्ष तथा रत्नागिरी जि.प.चे उपाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक संजू वाडे, असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा तथा जि.प. सदस्य डॉ. निलम पाटील, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांसह मान्यवर उपस्थित होते.
अशी आहे कार्यकारिणी
जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे, सल्लागारपदी रंजना पाटील, उपाध्यक्षपदी लालचंद पाटील, मनोहर पाटील, शशिकांत पाटील, नंदकिशोर महाजन, अरुणा पाटील, सरचिटणीसपदी नानाभाऊ महाजन, मधुकर पाटील, चिटणीसपदी सुरेखा पाटील, माहिती प्रचार व प्रसारकपदी हिम्मत पाटील, संघटकपदी रेखा राजपूत, पवन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षपदी जयश्री पाटील, जिल्हा उपाध्यक्षपदी पल्लवी सावकारे, किर्ती चित्ते, सविता भालेराव, यावल तालुकाध्यक्षपदी शेखर पाटील, चोपडा तालुकाध्यक्षपदी कल्पना पाटील, रावेर तालुकाध्यक्षपदी प्रतिभा बोरोले, मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी विकास पाटील, भुसावळ तालुकाध्यक्षपदी सुनील महाजन, जळगाव तालुकाध्यक्षपदी शीतल पाटील, धरणगाव तालुकाध्यक्षपदी मुकुंद नन्नवरे, अमळनेर तालुकाध्यक्षपदी प्रवीण पाटील, पारोळा तालुकाध्यक्षपदी अशोक पाटील, एरंडोल तालुकाध्यक्षपदी अनिल महाजन, जामनेर तालुकाध्यक्षपदी अमर पाटील, पाचोरा तालुकाध्यक्षपदी सुभाष पाटील, भडगाव तालुकाध्यक्षपदी रामकृष्ण पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी शिवाजी सोनवणे आदींची निवड करण्यात आली आहे.
कार्यकाळ वाढून मिळावा
बैठकीत कोरोना काळात सदस्यांना कामे करता आलेली नाहीत, त्यामुळे सदस्यांचा कार्यकाळ १ वर्षांसाठी वाढवून मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष तथा रत्नागिरी जि.प.चे उपाध्यक्ष उदय बने यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.