गावठी कट्टा, ८ काडतुससह दोन तरुण गजाआड, एलसीबीची कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । शहर आणि तालुका परिसरात दोन तरुण गावठी पिस्तुल व जिवंत काडतुससह फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह आव्हाणे गावातून सापळा रचून अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन तरुण गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ अनिल जाधव, पोहकॉ अशरफ शेख, निजामोददीन, पोकॉ दिपककुमार शिंदे, वाहन चालक पोहेकॉ विजय चौधरी यांनी माहिती काढली असता सागर देवीदास सोनवणे, भास्कर अशोक नन्नवरे दोन्ही (रा.बांभोरी ता धरणगांव) यांची नावे समोर आली.
दोन्ही तरुण आव्हाणे गावात असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांना सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. सागर देवीदास सोनवणे याच्या अंगझडतीत २५ हजार रुपये किमतीची सिल्वर रंगाची गावठी पिस्टल व २ काडतुस मिळून आले तर भास्कर अशोक नन्नवरे याचे पॅन्टच्या खिशात ३ हजार ७५० रुपये किमतीचे ६ काडतुस मिळुन आले. पथकाने दोघांना मुद्देमाल आणि त्याच्याकडील दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएम.४४४१ सह जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध जळगांव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.