⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | दुर्दैवी : गणेश विसर्जनाला गेलेल्या बहिणीचा बुडून मृत्यू, भावाला वाचविण्यात यश

दुर्दैवी : गणेश विसर्जनाला गेलेल्या बहिणीचा बुडून मृत्यू, भावाला वाचविण्यात यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२१ । गणपती विसर्जनासाठी गेलेले बालिकेचा तापी नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी घडली आहे. अनन्या मनीष यादव असे या मृत बालिकेचे नाव आहे. तर तिच्या भावाला मात्र वाचवण्यात यश आले आहे.

याबाबत असे की, मनीष यादव हे भुसावळ शहरातील झेडटीसी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवसानंतर ते आज सकाळी विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळ असणार्‍या तापी नदीच्या पात्रात आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते.

यावेळी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या ही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. यातच मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली.

यात आर्यनराज याला वाचविण्यात यश आले असले तरी अनन्या मनीष यादव ही बालिका मात्र बुडाल्याने यादव परिवार शोकाकुल झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अनन्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.