विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करा ; विद्यापीठाच्या सूचना
जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२१| विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना खानदेशातील काही महाविद्यालय गांभीर्याने रावेत नसल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनात आली आहे. यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींचे प्रत्यक्षात वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल विद्यापीठाला सादर करावा असे सूचना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजने अंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व शाखातील प्रथम व पदवी तर वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांकडून याबाबत २५ रुपये तपासणी फी देखील घेतली जाते. मात्र खानदेशातील काही महाविद्यालयात ही योजना आपल्या महाविद्यालयात राबवत नाहीत. व विद्यार्थ्यांना काही गंभीर समस्या निर्माण झाल्यास त्यांना मदत मिळण्यासाठी तांत्रिक अडचण येते.
या साठी 21 ऑक्टोबर पर्यंत वैद्यकीय तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिले आहे.