बातम्या

चतृर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आदीवासी संघटना तढा देणार : एम बी तडवी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१।  मागील तिस वर्षापासुन आदीवासी एकात्मीक विकास प्रकल्प विभागा अंतर्गत आदीवासी शाळा व वस्तीगृहावर अशा विविध पदांवर कार्यरत असलेले शेकडो चतृर्थश्रेणीतील कर्मचारी आज ही शासनाकडुन मिळणाऱ्या पदोन्नती व आदी सवलतीपासुन वंचीत असुन त्यांच्या समस्या लोकशाहीच्या मार्गाने शासना दरबारी पहोचवुन मान्य करून घेण्यासाठी आदीवासी विकास विभाग चतृर्थश्रेणी कर्मचारी एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी यांनी आज संपन्न झालेल्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात आपली भुमिका मांडली.

यावल येथील पुर्णवाद नगर परिसरातील रहिवासी तडवी सर यांच्या निवासस्थानी आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पार पडलेल्या आदीवासी विकास विभागच चतृर्थश्रेणी कर्मचारी एकता मंच, महाराष्ट्र ची बैठक मंचचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली , दरम्यान या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील एकात्मिक आदीवासी विभागाअंतर्गत काम करणारे चतृर्थश्रेणीतील मोठया संख्ये उपस्थित होते.

या बैठकीत आदीवासी विभागात सेवेत कार्यरत असणाऱ्या चतृर्थश्रेणी कर्मचारी बांधवांनी शासनाने दृर्लक्षीत असलेल्या विविध मागण्या व प्रलंबीत समस्यांचा पाढाच वाचला , यावेळी उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना आदीवासी विकास विभाग चतृर्थश्रेणी कर्मचारी एकता मंचचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एम बी तडवी यांनी उपस्थित कर्मचारी यांच्या मागील तिस वर्षापासुन शासनाच्या दृष्टीकोणातुन दुर्लक्षित असलेले चतृर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी, पेशन , अनुकंपा आधारावर कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी समावुन घेणे , त्याच बरोबर पगार मिळवण्यासाठी कार्यालयीन कारभारात होणारी आर्थिक लुट असे अनेक मुद्दे या विषयी त्यांनी उपस्थित कर्मचारी यांना संघटनाच्या माध्यमातुन एकजुटीने संर्घषातुन शासन दरबारी लढा दिलातर आणणास न्याय मिळेल असे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आश्वासीत केले.

आदीवासी विकास विभाग चतृर्थश्रेणी कर्मचारी एकता मंचच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली , या कार्यकारणीत जिल्हा अध्यक्षपदी दस्तगीर अरमान तडवी यांची तर उपाध्यक्षपदी विजयानंद बळीराम सुरवाडे व जगदीश सोनुसिंग नाईक , महीला विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी एम एन खरात तर जिल्हा महीला उपाध्यक्षपदी पुष्पलता भिकन जाधव ,सचिवपदी निलेश रज्जाक तडवी, सहसचिव प्रदीप यावर बारेला, खजिनदारपदी न्याजोद्दीन मिर हुसैन तडवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तर जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणुन दिपक बाबुलाल सोनोणे , नितिन शांताराम चौधरी , सिद्धार्थ जाधव , हेमराज प्रभाकर चौधरी , रोहीदास देवचंद पाटील , भरत विजय भेंडवाल, मनोज किशोर उजळेकर , संदीप दिलदार पावरा , प्रशांत गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे .बैठकीत राज्य कार्यकारणीचे मनिष तडवी सर यांनी बैठकीस आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button