बातम्या

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ‘ज्योतिषशास्त्र’ शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’च्या अंतर्गत ‘ज्योतिष शास्त्र’ हा विषय चालू करण्यात येणार असल्याचे वृत्त समजले.विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून ज्योतिष ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन विद्या आहे.यावर ‘ज्योतिष विषय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये,’अशी मागणी काही नास्तिक आणि हिंदु धर्मविरोधी संघटनांनी ज्योतिषशास्त्राचा कोणताही अभ्यास न करता केली आहे.या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’ने मुठभर ज्योतिषशास्त्र द्वेषी लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘ज्योतिषशास्त्र’ शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा !अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे यावल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात विद्यापीठाला आश्वस्त करताना हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, ‘आपल्या या निर्णयामुळे आपल्या विद्यापिठाच्या बाजूने समिती खंबीरपणे उभी आहे.वेळ पडल्यास आम्ही ‘ज्योतिष शास्त्रा’च्या समर्थनार्थ रस्त्यावरही उतरू.समाजातील बहुसंख्यांक समाजाचा ज्योतिष शास्त्राला पाठिंबा असल्याने ज्योतिष्य शास्त्र हा विषय विद्यापिठात निडरपणे आरंभ करावा.’
या निवेदनात ज्योतिष शास्त्राचे अनन्यसाधारण महत्व उद्धृत करताना सांगण्यात आले आहे की,
1)ज्योतिषशास्त्राचा हा अभ्यासक्रम विद्यापिठात येऊ नये;म्हणून या पूर्वी अगदी मोठमोठ्या वैज्ञानिकांनी आटोकाट प्रयत्न केले.मुंबई उच्च न्यायालय, नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालय,यानंतर सर्वोच्च न्यायालय येथेही ज्योतिष शास्त्राला आव्हान दिले गेले;पण सर्वोच्च न्यायालयाने तर वैज्ञानिकांचा दावा फेटाळत  ‘ज्योतिष हे विज्ञान आहे’,असा निर्वाळाही दिला.तसेच ‘काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला,म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’,अशी टिपण्णीही न्यायालयाने केली.त्यामुळे तथाकथित पुरोगामी संघटनांचा याला विरोध हा फोल ठरला आहे.
2)मुंबई उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने ‘ज्योतिषशास्त्र हे 4000 वर्ष जुने विज्ञान असून यावर बंदी आणली जाऊ शकत नाही’,असे म्हटले होते.
3)सहा वेदांगांपैकी ज्योतिष हे एक अंग आहे.ऋग्वेदात ज्योतिषशास्त्राचे36,यजुर्वेदात44,तर अथर्ववेदात162श्‍लोक आहेत.यावरून ज्योतिषशास्त्राचा वेदांशी दृढ संबंध आहे,हे सिद्ध होते;म्हणून ज्योतिषशास्त्राला खोटे म्हणणे म्हणजे ‘वेद खोटे आहेत’,असे म्हणण्यासारखे आहे.
4)ज्योतिष हे ‘कालज्ञाना’चे म्हणजे काळाचीअनुकूलता किंवा प्रतिकूलता सांगणारे शास्त्र आहे.व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिचा स्वभाव,जन्मजात लाभलेली कला-कौशल्य-बुद्धी,व्यक्तीला पूरक कार्यक्षेत्र,जीवनाचा एकंदर दर्जा आदी अनेक गोष्टींसंदर्भात उत्तमप्रकारे बोध होतो.आधुनिक विज्ञान सोडवू शकत नाही,अशा अनेक व्यक्तीगत अडचणींसंदर्भात ज्योतिषशास्त्र योग्य दिशादर्शन करते.समाजाला ज्योतिषशास्त्र आवश्यक आहे.ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे,म्हणूनच ते प्राचीन काळापासून लाखो वर्षे टिकले आहे.
5)ज्योतिषशास्त्राला विरोध करणारे मानसशास्त्र,तर्कशास्त्र आदी प्रस्थापित शास्त्रांना विरोध करत नाहीत.मानसशास्त्र शिकवतांना त्याची व्याख्या काय आहे?,मनाचे शरीरातील स्थान आजच्या विज्ञानाला माहिती नाही.तरी हे एक प्रगत शास्त्र आहे,हे पुरोगाम्यांना मान्य आहे.  आम्हीही याला शास्त्रच मानतो; पण ज्योतिषीय ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा नाही,त्याचे परिणाम आणि अभ्यास करण्याची तयारी नाही आणि ‘ते शास्त्रच नाही’अशी मोठी प्रौढी मिरवत आहेत.यातूनच पुरोगाम्यांचा ‘विवेक’म्हणजे काय,हे लक्षात येते.
6)दिनांक16मे2001या दिवशी ‘दैनिक सकाळ’मध्ये कृषीशास्त्रज्ञ अशोक जोशी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता आणि आहे.या लेखात ‘पंचांगातील पावसाची भाकिते  90 टक्क्यांहून अधिक जुळतात’, असे विधान त्यांनी केले होते.हे विधान त्यांनी राहुरी कृषी विद्यापिठातील चार-पाच जणांच्या मदतीने संशोधन केल्यानंतर केले होते.आजसुद्धा हवामान खात्याला पावसाचे भाकीत पूर्णपणे नीट सांगता येत नाही.मग ‘हवामान खाते बंद करा’,असे सांगायला अंनिसवाले का जात नाहीत?महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांनी सांगितले आहे,’हजारो कोटी रुपये खर्चूनही हवामानाचा अचूक अंदाज विज्ञान वर्तवू शकत नाही.तरी हवामानशास्त्राला आपण ‘शास्त्र’ म्हणून मान्यता देत असू तर ज्योतिषशास्त्राला का नाही?’राम राज्यात सुद्धा राक्षशी प्रवृत्ती होती त्याप्रमाणे कलियुगात सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या विरोध करण्यासाठी काही राक्षसी प्रवृत्ती असलेल्या संघटना ज्योतिषशास्त्राला विरोध करू पाहत आहेत असे सुद्धा दिलेल्या निवेदनात हिंदू जनजागृतीच्या सदस्यांनी म्हटले आहे.
7)इतकेच नव्हे,तर देशभरातील बहुतांश वृत्तपत्रे त्यांच्या वृत्तपत्रांतून नियमितपणे दैनंदिन,  साप्ताहिक,मासिक आणि वार्षिक प्रकारची राशी-भविष्ये प्रसिद्ध करतात.ती काय अवैज्ञानिकता आणि अंधश्रद्धा पसरवतात, असे समजायचे का?अंनिसवाले अशा वृत्तपत्रांना ‘राशी-भविष्ये छापण्याचे बंद करा’,असे का सांगत नाही?
8)विज्ञानातील आधुनिक घडामोडी आणि शोध यांच्या दृष्टीकोनातून पारंपरिक ज्योतिषशास्त्राच्या नियमांची मांडणी करून नवीन अभ्यासपद्धत आणि प्रमाणित अभ्यासक्रम सिद्ध करणे,तोे शिक्षक-ज्योतिष्यांना देणे,तसेच विद्यापिठात ज्योतिष विषयाचा अभ्यासक्रम ठरवण्यात ज्योतिषतज्ञांना पुष्कळ प्रमाणात यश मिळाले आहे.त्यामुळे आज भारतात यु.जी.सी.ने(विद्यापीठ अनुदान आयोगाने) हे शास्त्र म्हणून मान्य केले आहे.
9)भारतासह जगभरात54  विद्यापिठांमधून हे शास्त्र शिकवले जाते.वर्ष1960पासून’AFA – अमेरिकन फेडरेशन ऑफ एस्ट्रोलॉजर्स’ येथे ज्योतिष शिकवले जाते गेल्या20वर्षांपासून फ्लोरिडा येथील ‘अ‍ॅव्हलॉन स्कूल ऑफ एस्ट्रोलॉजी’ येथे ज्योतिष शिकवले जाते.याशिवाय वॉशिंग्टन(अमेरिका)येथील’केप्लर कॉलेज’, ‘NCGR प्रोफेशनल एस्ट्रोलॉजर्स अलायन्स’, ‘OCA -इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ एस्ट्रोलॉजी’, ‘केप्लर कॉलेज ऑफ एस्ट्रोलॉजिकल आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स’,’नॅशनल कौन्सिल फॉर जिओकॉस्मिक रिसर्च’,ऑस्ट्रेलिया येथील ‘फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन एस्ट्रोलॉजर्स, ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर एस्ट्रोलॉजिकल रिसर्च’,’फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन एस्ट्रोलॉजर’ ही यादी खूप मोठी आहे.या विद्यापिठांत ज्योतिषाविषयी पदविका ते पदवीपर्यंचे शिक्षण दिले जाते.थोडक्यात आपल्या महान भारतीय संस्कृतीचा,तसेच शास्त्रांचा विदेशात सखोल अभ्यास आणि संशोधन केले जात आहे;मात्र या शास्त्राची जननी असलेल्या भारतभूमीत त्याला अशास्त्रीय म्हणून काही तथाकथित पुरोगामी आणि नास्तिक विरोध करत आहेत,हे दुर्दैवी आहे.उद्या विदेशी लोकांनी ‘ज्योतिष’ विषयाचे महत्त्व सांगायला प्रारंभ केल्यावर भारतीय जागे होणार आहेत का?
10)राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे(एनसीएल)निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ शुक्ल यांनी सांगितले, ’35 वर्षांच्या संशोधनानंतर मी छातीठोकपणे सांगू शकतो की,ज्योतिष हे शास्त्रच आहे.’
11)राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये ज्योतिष हा विषय शिकविण्यास आरंभ केला असून त्याला मिळणारा प्रतिसादही चांगला आहे.अनेकांनी तर या विषयात ‘पी.एच्.डी.’सुद्धा मिळाली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’ने मुठभर ज्योतिषशास्त्र द्वेषी लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘ज्योतिषशास्त्र’  शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा !

हिंदू जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button