⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

म्हसावदच्या ‘बॅन्ड पावरी’ची दुबईच्या बारमध्ये फर्माईश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । खान्देशी अहिराणी गाणे, संगीताची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. दुबईच्या एका बारमध्ये सायंकाळच्या सुमारास मैफल रंगात येत असताना चक्क एकाने खान्देशी बॅन्ड पावरीची फर्माईश केली. अवघ्या काही मिनिटात युट्युबद्वारे साई बॅन्ड पावरी सुरू झाली आणि सर्वांची पाऊले थिरकली. म्हसावदचे संगीत अवघ्या आठवडाभरात सातासमुद्रापार पोहचले आहे.

म्हसावद येथील साई म्युझिकल बॅन्ड निर्मित मोहन पाटील यांनी साकारलेली आणि अजय केदार यांनी प्रस्तुत केलेले साई बॅन्ड म्हसावद पावरी नुकतेच युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले. प्रा.उमेश सूर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या या पावरीसाठी म्युझिक/रिधम अजय केदार, रेकॉर्डिंग, मिक्स मास्टर/डी.जे.भैय्या, नृत्यदिग्दर्शक हेमंत चौधरी, प्रविण ठाकूर, कलाकार मोहीनी जोशी, मयुर बारसकर, राज दाभाडे आणि डी.के.ग्रुप धुळे यांचे सहकार्य लाभले आहे. डीओपी विजय बनकर, सोनू थोरात तर पोस्टर राहूल पांडव यांनी साकारले आहे.

खानदेशातील झिंगी पावरी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. झिंगी पावरी आणि भवानी डान्स त्याच्या तालावर अनेकांची पावले थिरकत असतात. म्हसावद येथील साई म्युझिकल बॅन्डने आठवडाभरापूर्वी पावरीचे नवीन स्वरूप आठवडाभरापूर्वी यूट्यूबच्या माध्यमातून प्रदर्शित केले. अवघ्या आठवडाभरात पावरी म्युझिक प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.

दुबईच्या बारमध्ये वाजली पावरी
काही दिवसांपूर्वी दुबई येथील एका बारमध्ये काही रसिकांनी खान्देशी पावरीची फर्माईश केली. बार डीजे चालकांनी लागलीच युट्युबच्या माध्यमातून म्हसावदची लोकप्रिय पावरी वाजवली. रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली. एका मराठमोळ्या रसिकाने गाण्यात दिलेल्या नंबरवर संपर्क साधत एक व्हिडिओ देखील करून पाठवला.

एका आठवड्यात १ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज
आपल्या ग्रामीण भागात दिवसा आणि रात्री चित्रीकरण करून साकारलेल्या या संगीतमय कलाकृतीला आठवडाभरापूर्वी युट्युबच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले. अवघ्या आठवडाभरात पावरीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून १ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज झाले आहेत.