जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । शहरातील चोरीच्या घटना थांबतच नसून दर दिवसाला एक तरी चोरी, घरफोडी उघड होत आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास गणेश कॉलनीतील विष्णू नगरात चारचाकी वाहनाने आलेल्या तिघांनी घरफोडी करीत दागिन्यांसह रोकड लंपास केली.
विष्णू नगरातील साईप्रभा इमारतीत जयश्री संजय होले या परिवारासह राहतात. सकाळी १० वाजता ते घर बंद करून कामावर गेले होते. दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास चारचाकीने आलेल्या तिघांनी त्यांचे घर फोडून सोन्याची चेन, अंगठ्या, कानातले आणि १० हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. सायंकाळी घरी आल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू आहे.