कोरोनाजळगाव जिल्हाजळगाव शहर
जळगावकरांनो मॉलला जाताय तर अगोदर हे वाचा… शासनाचे नवीन निर्देश जारी
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध शिथील केले असले तरी मॉल आणि इतर काही ठिकाणी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नवीन निर्देश जारी केले आहेत. कोविड लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असलेल्यांच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावे. दुसऱ्या लसीचा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अद्याप लस देण्यात येत नसल्याने त्यांनी मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा ग्राह्य असलेला पुरावा जवळ बाळगणे आवश्यक आहे.