चुंचाळे-बोराळे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा ; भीम आर्मीची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । यावल तालुक्यातील चुंचाळे बोराळे परिसरात वाढते चोरीचे सत्र बघता सी.सी.टी. व्ही. बसवावे असे भीम आर्मी मार्फत दोन्ही गावाच्या ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील चुंचाळे-बोराळे येथे गावच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असल्याने परिसरातील रहिवासी व शेतकरी बांधवांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक शेतकरी यांच्या बैल जोडीची चोरी चोरट्यांनी केले. ऐन शेतीचे हंगाम चालू असल्याने बैल जोडी चोरीला गेल्याने शेतीचे काम खोळंबतीलच व मोठे आर्थिक नुकसान झाल्याने सदर परिवारांच्या समोर एक संकट ठाकले हेते आणि ते दिसून आले. तसेच अश्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण उपाययोजना राबावाव्या कारण मागील गेल्या एक ते दोन महिन्यांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे परंतु प्रशासन तपास लावण्यात अपयशी ठरल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.