जळगाव शहर
जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी काल रात्री १२.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे कि, जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. शनिवार ७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरासमोर असलेली असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी नातेवाईक व परिसरात शोधाशोध केली परंतू मुलगी आढळून आली नाही.
याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी शहर पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र परदेशी करीत आहे.