जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । तुम्ही जर रेल्वेने कुठे जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने सीटच्या बुकिंग कोड आणि कोच कोडमध्ये मोठे बदल केले आहेत. आता तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करताना विशेष कोडची गरज लागणार आहे. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्हाला सीट मिळणार नाही.
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यात आता भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये एक नवीन प्रकारचा कोच आणला आहे. त्यात तुम्हाला तिकीट आरक्षण करताना त्यांच्या आवडीची सीट सहज मिळेल. यासह रेल्वे देशभरातील अनेक मार्गांवर व्हिस्टाडोम कोच ट्रेन सुरू करणार आहे, ज्यामुळे हा बदल देखील झालाय.
एसी -3 टायरचा इकॉनॉमी क्लासदेखील नवीन कोचमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. या प्रकारच्या कोचमध्ये सुमारे 83 बर्थ उपलब्ध असतील, असे रेल्वेने सांगितले. सध्या या बर्थचे भाडे अद्याप निश्चित झालेले नाही. लवकरच भाडेदेखील रेल्वे विभागाकडून सांगितले जाईल.
विस्टाडोम कोच खूप खास आहे. यात प्रवास करणाऱ्यांना खूप मजा येईल. या कोचमध्ये आत बसून तुम्ही बाहेरच्या दृश्याचा आनंद घेऊ शकता. या डब्याचे छत काचेचे बनलेले आहे. सध्या हा व्हिस्टाडोम कोच मुंबईतील दादर ते गोव्यातील मडगावपर्यंत चालतो.
या प्रकारच्या कोचमध्ये तिकीट बुक करणाऱ्यांनी लक्षात घ्या की, थर्ड एसी इकॉनॉमी कोचसाठी तुम्हाला 3E बुक करावे लागेल. यासह कोचचा कोड एम असेल. त्याचप्रमाणे विस्टाडोम एसी कोचचा कोड EV म्हणून ठेवण्यात आलाय.
नवीन बुकिंग कोड आणि कोच कोड तपासा
-विस्टाडोम व्ही. एसची बुकिंग कोड आणि कोच कोड AC DV
-स्लीपरची बुकिंग कोड S.L. आणि कोच कोड एस
-एसी चेअरकार बुकिंग कोड C.C आणि कोच कोड C
-थर्ड एसी बुकिंग कोड 3 ए आणि कोच कोड बी
– AC 3 Tier Economy बुकिंग कोड 3E आणि कोच कोड M
-सेकंड एसी बुकिंग कोड 2 ए आणि कोच कोड ए
-गरीब रथ एसी 3 टियर बुकिंग कोड 3 ए आणि कोच कोड जी
— गरीब रथ चेअरकार बुकिंग कोड सीसी आणि कोच कोड जे
-प्रथम एसी बुकिंग कोड 1 ए आणि कोच कोड एच
-एग्जिक्युटिव्ह क्लास बुकिंग कोड E.C आणि कोच कोड E
-अनुभूती क्लास बुकिंग कोड E.A आणि कोच कोड के
-प्रथम श्रेणी बुकिंग कोड F.C आणि कोच कोड F
-विस्टाडोम एसी कोच कोड E.V आणि बुकिंग कोड E.V