दहावीनंतर सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आली आहे. पश्चिम बंगाल सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २३५७ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करू इच्छित असणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे. भारतीय पोस्टामध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे.
शैक्षणिक पात्रता
पश्चिम बंगाल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदावरील भरतीसाठी केवळ दहावीपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तरी त्यांचं दहावीचं गुणपत्रक ग्राह्य धरलं जाईल. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयाचा चा अभ्यास केलेला असणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी दहावी सोबत संगणकाचं प्रमाणपत्र मिळवलेलं असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त व 40 वर्षांपेक्षा कमी असावे. 20 जुलै 2021 रोजीचं वय ग्राह्य धरलं जाईल. तर, अनुसूचित जाती / जमाती, ओबीसी, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी एससी / एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना अनुक्रमे 5,3,10,13,15 वर्षांची सूट असेल.
निवड प्रक्रिया
पश्चिम बंगाल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक या पदासाठी उमेदवारांची निवड पात्रता परीक्षेच्या आधारावर म्हणजेच दहावीच्या गुणांसाठी केली जाईल. दहावीच्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाइट : appost.in
जाहिरात Notification : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा